Mi...

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
मी.... मी आहे हा असा आहे, पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या... अगदी एखाद्या कवीतेसारखा, आवडली तर ऐका नहितर नीघून जा... कुणालही सांगणार नाही,जबरद्स्ती तर मुळीच नाही, समजले पटले तर करा नाहीतर विसरून जा... तुम्ही जगताय ते योग्य अन् मझ जगण अयोग्य, जरा असही जगून बघा निश्फळ वाटल तर नावं ठेवा... तुमच्या आध्यात ना मध्यात ना मझा कुणाला त्रास, कशाला उगीच वैतागताय कशाला उगीच सन्ताप्ताय... करावस वाटलं तर एकच् करा मी जगतोय तस मला जगू द्या... का नवं ठेवता उगाच मी करतोय ते मला करु द्या... म्हणूनच म्हणतो.. मी आहे हा असा आहे, पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या

गुरुवार, २ जून, २०११

दरवळ.....

 


आजचा दिवस संपता संपता काही वेगळेच रंग उधळून गेला......रंग वेगळे...हवा वेगळी...आजूबाजूचा वातावरण ते देखील वेगळं....सगळच कसा धुंद......भरलेला....दिवसाची मरगळ, चिकचिक  वाऱ्याने कुठच्या कुठे उडवून लावली.... खिडकीतून येणारा वारा अंगावर घेत असतानाच....जमिनीवर थेंबांचा कोलाज सुरु झाला.....आणि काही क्षणातच अवघा रंग एकाची झाला......स्वतःचा अस्तित्व घेऊन पडलेल्या पावसाच्या  प्रत्येक थेंबाला जमिनीने मात्र न्याय दिला.....प्रत्येक थेंब अंगावर झेलत नुसती मोहरून निघाली....
निसर्ग इतकी सगळी उधळण करत असताना...घरात बसून राहणं शक्यच न्हवता....तडक उठले....ती दिरेच्त घराबाहेरच.....मनसोक्त पाऊस अंगावर घेत...झाडांशी  गप्पा मारत...पाण्यात खेळत बागडत....१/२ तासाने घरी आले तरी बाहेर निसर्गाची उधळण चालूच होती....स्वछंदी मुक्त हस्ते..... कॉम्पुटर वर जुन्या गाण्यांच्या ओळी  आणि  वातावरणात मृदगंध दरवळत राहिला......