कर्ण.........
कोणत्या तरी मराठी वाहिनी वर मृत्युंजय सुरू होणार याची जाहिरात पहिली....आणि मन खूप वर्ष मागे गेल.....
मृत्युंजय या कादांबरीने माझी वाचनाची आवड च बदलून टाकली....खरा म्हणजे ही कादांबरी हातात घेतली ते फक्त सगलयानी सांगितला की खूप छान आहे वाचली पाहिजे म्हणून.....महाभारत किंवा कर्ण याबद्दल विशेष काही जाणून घ्यावा असा कधी वाटला नाही
पण मृत्युंजय हातात घेतला आणि मी कर्णाच्या प्रेमात च पडले........अख्ख्या महाभारतात जर कोणता पात्र मनापासून आवडल असेल आणि पटल असेल तर ते कर्ण आहे.....
मध्यंतरी व.पु.काळे यांच 'आपण सारे अर्जुन' वाचनात आल......त्यामधे त्यानी अतिशय उत्तम रित्या दाखवून दिला आहे की हे जीवन कसा कुरुक्षेत्र आहे आणि आपण कसे अर्जुना सारखे हतबल असतो....
पण ते वाचताना सुद्धा मला एक गोष्ट सारखी जाणवत होती आणि ती म्हणजे आपण सारे कर्ण जास्त असतो.....
एक मानस शास्त्रज्ञ म्हणून काम करताना आणि आजच्या तरुण पिढी सोबत वावरताना मला सगळे अर्जुन कमी आणि कर्ण जास्त वाटतात...
त्यातलाच एक हे विचारांच चित्रण.....मी एका मुलाला मृत्युंजय कस वाटला हे विचारात होते....त्याला सांगण्याचा प्रयत्न करत होते की कर्ण कसा कठीण आयुष्या जगला वगैरे.....
आजची मुल कसा आणि किती खोल विचार करतात याचा हे चित्रण......त्यांच्या मनात किती खळबळ असते त्याचा हा नमूना
कर्ण हा सूत पुत्र म्हणून त्याला बर्याच गोष्टीन पासून वंचित राहावा लागल...आज आपल्याकडे पण "आरक्षण" या नावाखाली बर्याच जणांना चांगल्या संधींपासून वंचित राहावा लागता.....अर्जुन राजकुमार होता म्हणून त्याला सहजा सहजी सगळ्या विद्या, अस्त्र ज्ञान, गुरू जणांचा आदर लाभला, पण कर्ण...त्याला या सगळ्या गोष्टी सतत संघर्ष करून आणि झगडून च मिळवावया लागल्या.....आजची तरुण पिढी ची तरी काय वेगळी अवस्था आहे? कष्ट करून मारुन मारुन 90%-92% मिळवायाचे....आणि अड्मिशन घ्यायचा वेळी बघायला काय मिळणार? ओपन लिस्ट क्लोज़....एका एका पॉइण्ट ने अड्मिशन गेली पण रिज़र्वेशन लिस्ट मात्र 50-60% सुद्धा अड्मिशन चालू......
तीच कथा नोकरी मधे...आंगच्या गुणानपेक्षा कोण साहेबा च्या मर्जितला त्याला जास्त संधी.......जसा अर्जुनाला श्री कृष्ण........
मग आम्ही फ्रास्ट्रेट नाही होणार? का नाही कोणत्या दुर्योधनाची साथ देण्याचा विचार करणार......दुसर्या कोणाच्या स्वार्ता साठी का होईना आम्हाला जर आमचे गुण दाखवण्याची संधी मिळाली तर का नाही आम्ही ती घ्यायची...
असा प्रश्न उभा राहणार च ना???
आजच्या आम्हा तरुणांमधे आणि कर्ण यात आजुन एक साम्य म्हणजे आमची कामाला वाहून घेण्याची वृत्ती, एखादी गोष्ट मिळवण्याचा ध्यास आणि त्यासाठी कितीही कष्ट करण्याची तयारी......कर्ण परशूरामकडे शिकला.....एक चुक आणि त्याला शाप मिळला.....
तसाच काहीसा होता आमच पण.....सगळ नीट असत एक च चुक होते आणि होत्याच न्हव्ता होऊन बसता......
कर्ण हा Misguided होता....आमचा पण तसाच काहीसा आहे......आम्ही पण चांगले आहोत खूप चांगले आहोत पण 1-2 चुकांमुळे आम्ही भरकटलेले आहोत.......आम्हाला कोणी कृष्ण भेटेल? जो कोणत्या अर्जुनसाठी आमचा वध नाही करणार......