लौकिकार्थाने त्या तिघी "एकट्याच"… तिघी वयाच्या वेगळ्या टप्प्यावर…वेगळ्या कारणांमुळे ….लग्न झालेल्या तरीही एकट्या …
आयुष्याच्या प्रवासात उतार एकत्र ,संध्याकाळी निवांत पणे चालत असताना त्याच्यासोबतचा अचानक संपलेला तो प्रवास तिला एकट करून सोडतो …
समाजासाठी लग्न झालेला आहे पण जो घरात त्या समाजाचा आब न बाळगता मनावरच नाही तर शरीरावर देखील तेवढेच वार करणारा जाणीवपूर्वक घटस्फोट घेऊन "तो संपवलेला" प्रवास तिला एकट करून सोडतो…
स्वताचा मान म्हणजे "आत्मसन्मान", आणि तुझा मान म्हणजे "इगो"…. अश्या परिस्थितीत पुन्हा एकदा नवीन वाटा शोधण्याचा तो प्रवास तिला एकट करून सोडतो …
ती एकटी आहे पण "ती" आहे…. मुलं बाळ, नातवंड साऱ्यानी मिळून आयुष्य पूर्ण आहे….स्वतच्य ररुटीन मध्ये ती रमते आहे…अर्धा राहिलेला प्रवास तो सोबत आहे असा मानून एकटी 'एन्जोय' करते आहे…
ती समृद्ध आहे……
ती एकटी आहे पण "ती" आहे…. घरात, नातेवाईकांमध्ये वेगळी/अबोल असलेली ती बाहेरच्या जगात हसते आहे, खेळते आहे…… नात्याचा कदाचित 'धसका' घेतलाय तिने… पण हळू हळू ती उमलत आहे….त्याच नसणं ती 'एन्जोय' करते आहे….
ती स्वतःला स्वतःमध्ये शोधण्यात मग्न आहे….
ती एकटी आहे पण "ती' आहे… मुलांसाठी आई आणि बाबा तीच आहे… स्वतःची स्पेस मिळवत मोकळा श्वास ती घेत आहे… लोकांसाठी अजूनही होप्स आहे… पण तिच्या भरारीची तयारी केंव्हाच झालेली आहे…
खऱ्या अर्थाने तिच्या जीवनाची ती 'शिल्पकार ' आहे.…
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा