आजचा दिवस संपता संपता काही वेगळेच रंग उधळून गेला......रंग वेगळे...हवा वेगळी...आजूबाजूचा वातावरण ते देखील वेगळं....सगळच कसा धुंद......भरलेला....दिवसाची मरगळ, चिकचिक वाऱ्याने कुठच्या कुठे उडवून लावली.... खिडकीतून येणारा वारा अंगावर घेत असतानाच....जमिनीवर थेंबांचा कोलाज सुरु झाला.....आणि काही क्षणातच अवघा रंग एकाची झाला......स्वतःचा अस्तित्व घेऊन पडलेल्या पावसाच्या प्रत्येक थेंबाला जमिनीने मात्र न्याय दिला.....प्रत्येक थेंब अंगावर झेलत नुसती मोहरून निघाली....
निसर्ग इतकी सगळी उधळण करत असताना...घरात बसून राहणं शक्यच न्हवता....तडक उठले....ती दिरेच्त घराबाहेरच.....मनसोक्त पाऊस अंगावर घेत...झाडांशी गप्पा मारत...पाण्यात खेळत बागडत....१/२ तासाने घरी आले तरी बाहेर निसर्गाची उधळण चालूच होती....स्वछंदी मुक्त हस्ते..... कॉम्पुटर वर जुन्या गाण्यांच्या ओळी आणि वातावरणात मृदगंध दरवळत राहिला......
३ टिप्पण्या:
बरेच दिवस झाले, तुमच्याकडून काही लिखाण नाही. ... looking forward to more of your writing !
Aprateem
टिप्पणी पोस्ट करा