Mi...

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
मी.... मी आहे हा असा आहे, पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या... अगदी एखाद्या कवीतेसारखा, आवडली तर ऐका नहितर नीघून जा... कुणालही सांगणार नाही,जबरद्स्ती तर मुळीच नाही, समजले पटले तर करा नाहीतर विसरून जा... तुम्ही जगताय ते योग्य अन् मझ जगण अयोग्य, जरा असही जगून बघा निश्फळ वाटल तर नावं ठेवा... तुमच्या आध्यात ना मध्यात ना मझा कुणाला त्रास, कशाला उगीच वैतागताय कशाला उगीच सन्ताप्ताय... करावस वाटलं तर एकच् करा मी जगतोय तस मला जगू द्या... का नवं ठेवता उगाच मी करतोय ते मला करु द्या... म्हणूनच म्हणतो.. मी आहे हा असा आहे, पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या

रविवार, १६ जून, २०१३

Celebrating Silence......



बेदुंद वारा..... उसळलेला समुद्र....सळसळणारि झाड.....भिजलेले पक्षी.....वाहणारा ओढा.....डूलणरी शेत...चरणारी गुरा...........टपोरे थेंब.....मातीचा सुगंधा....स्वच्छ रस्ते....हिरवीगार पान.....लाल गुलमोहर....चुलिचि धग...हातात काफ़ि चा  मग....दूरवर कुठेतरी गाण्याच्या चार ओळी....आणि आपण नझर लावून...स्वतःच्या तन्दरित.......

आयुष्य म्हणतात ते हे.....Yaaaaaaaaaaaar.....time for Monsoon Picnic :-)







शनिवार, १५ जून, २०१३

maitra



मैत्र! एक गोंडस नाव, एका नात्याचं. रम्य बालपणात; त्या वेड्या भिरभिरणाऱ्या वयात हे मैत्र किती तऱ्हांनी बागडत असतं आपल्याबरोबर, नाही? या मैत्रीला कुठे बांधून धरून ठेवावं कळतच नाही तेव्हा. समुद्रकाठच्या वाळूसारखी सटकून जाते ती पायाखालून. मग वाळू सोडून नावेत बसतो आपण; लाटांवर स्वार होण्यासाठी, एकटेच. पण कसा कुणास ठाऊक, आहे आहे म्हणेपर्यंत रस्ता चुकतो आपला. कायमची चुकामूक. मग आपापल्या वाटेवरून चालत राहायचं, एवढंच उरतं आपल्या हातात. पण त्या मैत्रीला सुरक्षित जपून ठेवायचं काम चोख बजावतं आपलं मन.....







शुक्रवार, १४ जून, २०१३

बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत




पावसाळा.....काहीतरी वेगळ नात आहे याच्याशी.....आता बघा ना अख्खी 2 वर्षा गेली मधे मी पण इथेच, ब्लॉग पण तिथेच पण कधी वाटलच नाही काही लिहावा, काही शेर करावा..आणि आज अनाहूत पणे घरच्या मागे उगवलेली 2 लिली ची फुला दिसली आणिअचानक आठवण झाली...Kaleidoscope ची, मागच्या दरवल या पोस्ट ची......त्यावेळी मातीच्या दरवळाने धुंद होऊन गेलेले यावेळी 2 लिली च्या फुलानी परत जाग केला....

कसा चमत्करी आहे नई पाउस.....त्याचा स्पर्शाने त्याच्या नुसत्या येण्याने काहीतरी उमलतच...मातीतून रोपट, मोरची सुरेल तान आणि स्रुजनचा मनात विचारांच रान.....पावासासोबत स्वतःला मुक्त करण्याची धडपड सगळ्यांमधे जाणवते, दिसते.....आणि 2 क्यूट लिली च्या रूपात ती व्यक्त पण होते......

खूप दिवस आपण वाट बघत असतो...हुलकावण्या देतो आपल्याला , खेळतो, चिडवतो अगदी अंत पाहतो, आणि आपण जेंव्हा वाट बघण सोडून देतो, तेंव्हा अचानक अगदी अवचित पणे येतो आणि चिंब चिंब करून सोडतो...त्याचा आणि जमिनीच काय इतका हितगुज सुरू असता....

तो अखंड बरसात असतो,आंग घुसळतो,केसंशी खेळतो,  उगाच छेडतो, भिजवतो, लाडात येतो, आणि ती....ती  फक्त मुग्धा पणे ऐकत असते....त्याच्या खोड्यांमधे त्याला साथ देत असते....शांत पणे त्याला सामावून घेत असते.....आणि तृप्त होत असते....
तिची शांतता, तृप्ताता आणि समाधान आपल्यालाही जाणवत, अनुभवता येता जेंव्हा 2 लिली ची फुला पाहून आपल्याला उगाच हसायला येता, खूप क्यूट वाटत.....