Mi...
- Shraddha
- Mumbai, Maharashtra, India
- मी.... मी आहे हा असा आहे, पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या... अगदी एखाद्या कवीतेसारखा, आवडली तर ऐका नहितर नीघून जा... कुणालही सांगणार नाही,जबरद्स्ती तर मुळीच नाही, समजले पटले तर करा नाहीतर विसरून जा... तुम्ही जगताय ते योग्य अन् मझ जगण अयोग्य, जरा असही जगून बघा निश्फळ वाटल तर नावं ठेवा... तुमच्या आध्यात ना मध्यात ना मझा कुणाला त्रास, कशाला उगीच वैतागताय कशाला उगीच सन्ताप्ताय... करावस वाटलं तर एकच् करा मी जगतोय तस मला जगू द्या... का नवं ठेवता उगाच मी करतोय ते मला करु द्या... म्हणूनच म्हणतो.. मी आहे हा असा आहे, पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या
शनिवार, ३१ जुलै, २०१०
ते क्षण भिजलेले......
ते क्षण भिजलेले....
तुझ्या माझ्यातले.....ओल्या चिंब पावसातले
डोळ्यावरून ओघळणारे....ओठानि टिपलेले
ते क्षण भिजलेले....
बेधुन्ध भिजण्याचे...मिठीत शिरण्याचे...
हसता हसता रडण्याचे...अश्रू पावसात लपवण्याचे...
ते क्षण भिजलेले....
कधी नुसतेच खिडकीत बसून राहायचे....कधी हातात हात घालून फिरायचे...
कोसळणार्या सरींचे मूक साक्षीदार बनायचे...
ते क्षण भिजलेले....
हळूवार पणे जपलेले....आठवणीच्या राज्यात अलगद उलगडणारे.....
तुला माझ्यात आणि मला तुझ्यात समावणारे.....
ते क्षण भिजलेले....
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा