Mi...

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
मी.... मी आहे हा असा आहे, पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या... अगदी एखाद्या कवीतेसारखा, आवडली तर ऐका नहितर नीघून जा... कुणालही सांगणार नाही,जबरद्स्ती तर मुळीच नाही, समजले पटले तर करा नाहीतर विसरून जा... तुम्ही जगताय ते योग्य अन् मझ जगण अयोग्य, जरा असही जगून बघा निश्फळ वाटल तर नावं ठेवा... तुमच्या आध्यात ना मध्यात ना मझा कुणाला त्रास, कशाला उगीच वैतागताय कशाला उगीच सन्ताप्ताय... करावस वाटलं तर एकच् करा मी जगतोय तस मला जगू द्या... का नवं ठेवता उगाच मी करतोय ते मला करु द्या... म्हणूनच म्हणतो.. मी आहे हा असा आहे, पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या

बुधवार, २० एप्रिल, २०११

200 रुपयात सामाजिक वनीकरण





आयुष्यात रिज़ाइन केल्यावर मिळणार सुख हे फक्त बॉस नामक माणसाच्या हातातून सुटका झाली इतकाच मर्यादित  नसता तर त्याही पलीकडे बर्‍याच गोष्टी असतात याची नव्याने जाणीव झाली

शाळा-कॉलेज-पोस्ट ग्रॅज्युएशन आणि  करियर साठी नोकरी.........सगळ्यांच जे रुटिन तसच माझाही...सकाळची ट्रेन.....गर्दी, धडपड, लोकांची नाटका आणि नखारे...काही म्हणा वेस्टेन च्या लोकांमधे आटिट्यूड जरा जास्तच असतो... त्यातून फर्स्ट क्लास म्हणजे तर.....बाप रे....जणू काही सगळ्यांचा माहेर लंडन आणि सासर पॅरिस असल्यासारखा ईंग्लिश....आणि आपण म्हणजे काचेची बहुली आणि आजूबाजूच्या लोकना आपल्याला धक्का देण्यासाठीच या लोकल मधे पाठवला आहे असा आविर्भाव......जरा धक्का लागला की oppps.....can't you see?? GOD knows from where these people are coming...  अशी टिप्पणी सुरू होते......
गेले काही दिवस या सगळ्यातून सुटका झाल्याचा सुख काही खास वाटून जाता...आहाआ सकाळी उठायचा.....छान जिम ला जाऊन यायचा...गरम गरम चहा आणि सुब्ब्लक्शमि ची कॅसेट...वा वा.....दिवसाची सुरवात एकदम सुंदर होऊन जाते.....कोणाची साडी पायात अडकायला नको...कोणाची बॅग नकवर आदलायला नको... :-) सुख सुख म्हणतात ते हेच......

या सरळ सोट (????) 2.5 वर्षयांच्या काळात किती काय काय मिस केला  हे.....घरी बसल्यावर जाणवला.....किती दिवसात उगाचच कारण नसताना नुसतच भटकलो नाहीत.....खिशात फक्त 50 रुपये घेऊन जीवाची मुंबई केली नई.....शॉपिंग मॉल च्या गर्दीत भुट्टा खात  कधी कट्ट्यावर बसलो नाही.....नदीत डुंबलो नाही....झाडावर चढलो नाही..मातीत खेळलो नाही......म्हणजे काहीच केला नाही......सगळ्याच गोष्टी हरवल्या की.....अख्खा दिवस कसा संपतो हेच काळात नव्हत....या सगळ्या गोष्टी करण्यात संपणारा  दिवस आता ते काहीच करता संपातोय.....असा काय ते...काहीतरी चुकतय.....इतकाच  फक्त काळात होता..कुठे काय कसा लक्षात नव्हत येत......पण आता सगळाच कळलाय.....आणि म्हणून या सगळ्या गोष्टी जमतील तश्या आणि जमतील तेवढ्या करण्याचा प्रयस सुरू केला

आता वर लिहिलेल्या सगळ्याच गोष्टी करून झाल्या असा नाहीत...पण एक नक्की केली....मातीत खेळण....
खूप दिवसात झाडांकडे  बघायला जमला नव्हता.....परवा सहज चक्कर मारताना मूड आला झाड घेऊन जाण्याचा...."हे कुठला झाड आहे रे??....साधारण कधी फुला येतात याची?? किती काळ बहर टिकेल?? किती पाणी घालायचा??"  हे असले सगळे संवाद गेले काही दिवस चालू आहेत.....आता मुंबई मधे गार्डेनिंग  वगैरे करायला बाबा आम्ही काय गरवारे, शर्मा, पटेल बितेल नाही हो... सरड्याची  धाव कुंपणापर्यंत तसच जोश्यांच गार्डेनिंग 700 स्क्वे. फूट फ्लॅट च्या गॅलरी पर्यंत.... :-) तरी पण
म्हटला चला "सामाजिक वनीकरण" करूया....आणि  चक्क 200 रुपयाची फक्त झाडा घेऊन आले एकदम8-10 नवीन मेम्बर्स आले आमच्या घरी......किती तरी नवी झाड पहिल्यांदाच पहिली.....किती तरी वेळ त्या झाडं मधे होते...हे घेऊ की ते घेऊ ? कोणता छान दिसेल? कुठे लावता येईल......आणि गेले कित्येक दिवस माज़यच घराकडे कधी नीट आपण पहिलाच नाही याची जाणीव झाली.....मी नव्याने घर बघायला लागले...मस्त  नवीन 8-10 झाड घेऊन झाल्यावर बिचारा दुकानदार म्हणाला...मॅडम बाकीची नंतर घेऊन जा....अजुन व्हरायटी येईल बघा......
घरी आल्यावर ती झाडा लावण्यासाठी म्हणून कुंदीत माती टाकली  पाणी घातला आणि अहाआ......मातीचा जो काही सुंदर वास आला....किती तरी वेळ त्या मातीत खेळात बसले.......वा....आजचा दिवस परत वसूल झाला.... :-)
आमचा दुकानदार म्हणाला तसा....मॅडम घरच्याना सांगा ग्लोबल वाओर्मिन्ग विरुध तुम्ही एकदम मोहिम उघडली आहे.....
त्या ग्लोबल वाओर्मिन्ग ला काही ज़ला असेल नसेल.....माझ्या डोक्यात उठलेल्या तपासाठी ती झाड म्हणजे एकदम रामबाण उपाय ठरली आहेत हे नक्की.......
आता रोज सकाळी सकाळी उठायचा.....मग जिम....सुब्ब्लक्शमि ची कॅसेट... ऐकत झाडांना पाणी  घालायचा  आणि मातीचा सुगंध घेत घेत गरम गरम चहा वा वा.....दिवस खूप सुंदर आहे.....
 






 


२ टिप्पण्या:

Tejas Kulkarni म्हणाले...

Hey Shraddha....Its really nice......Shabdan chi maandani khupach changlya paddhati ne keliyes....
Continue this good work yaar

Shraddha म्हणाले...

@ tejas: thanks....:-)