Mi...

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
मी.... मी आहे हा असा आहे, पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या... अगदी एखाद्या कवीतेसारखा, आवडली तर ऐका नहितर नीघून जा... कुणालही सांगणार नाही,जबरद्स्ती तर मुळीच नाही, समजले पटले तर करा नाहीतर विसरून जा... तुम्ही जगताय ते योग्य अन् मझ जगण अयोग्य, जरा असही जगून बघा निश्फळ वाटल तर नावं ठेवा... तुमच्या आध्यात ना मध्यात ना मझा कुणाला त्रास, कशाला उगीच वैतागताय कशाला उगीच सन्ताप्ताय... करावस वाटलं तर एकच् करा मी जगतोय तस मला जगू द्या... का नवं ठेवता उगाच मी करतोय ते मला करु द्या... म्हणूनच म्हणतो.. मी आहे हा असा आहे, पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या

गुरुवार, २१ एप्रिल, २०११

Organic बहर


काल म्हटल्याप्रमाणे दिवसाची सुरवात अगदी मनासारखी झाली....चहाचा कप आणि मातीचा सुगंध...वाह वाह......एका छोट्याश्या प्लास्टिक च्या पिशवीत उगवलेली ती छोटी छोटी झाड....जेमतेम फुटभर असतील तरी  त्याला कितीतरी फुल येतात..केवढी  छान दिसतात इतकी छोटी  झाड  फुलांनी भरलेला....झाड घेत होते तेंव्हा त्याला विचारलेला कि काय रे याला फुला साधारण कधी येतात?? काय सिझन आहे फुलांचा???? मला उत्तर मिळाला ताई अहो आजकाल नेहेमीच येतात फुला हायब्रीड  केली आहेत ना... नेहेमीच असतात फुला.....कोणताबी  झाड उचला...फुला येतील नेहेमी की काळजी नका करू...हा फक्त चांगली आणि भरपूर फुला यायला त्यांना मधून मधून ओर्गानिक टाका म्हणजे मग बघा झाड कसा लयी बेस फुला देतय......मग काय आमची स्वारी खुश...घेऊन आलो..घरी या मोठ्या (???) झाडांचा आगमन झालं.....


















आपण पण असेच असतो ना..छोट्याश्या घरात सुरक्षित वातावरणात लिमिटेड मातीत उगवतो...निपजतो...बहरतो(?????) लहान वयात मोठ्या मोठ्या गोष्टी मिळवतो....वयाने  लहान पण कितीतरी कमावतो.....एका छोट्याश्या पिशवीत जगतो....त्यात असणाऱ्या मातीतून च फुला येतात...कमी फुला येतात वाटला कि घातला ओर्गानिक...मग काय फुलच फुला.....हे म्हणजे अकाली प्रौढत्व आल्यासारखा नाही  वाटत...मुळात त्याला झाड म्हणायचं का हाही एक प्रश्न असतो...झाड म्हणण्यासाठी त्याची ना उंची असते ना विस्तार असतो...पण रोपटं  म्हणाव तर भरघोस फुला येत असतात...काय म्हणायचं काय??? च्यायला झाडांमध्ये पण identity crisis ?? झाडाचा बहार हा त्याला मिळणारा हवामान, माती, पाणी  या सगळ्यावर  अवलंबून असतो ...पण इथे सगळाच मामला प्रोटेक्टेड आणि लिमिटेड....सगळा आखून दिलेला.....लिमिटेड माती, लिमिटेड जागा, वाढ चांगली व्हावी म्हणून कापल्यामुळे लिमिटेड उंची, सगळा कसा आखीव रेखीव...कुठेच स्वतःच वाढणं नाही....जगायला लागणारं सगळच कोणीतरी दुसरा पुरवतोय...घेतोय काळजी...त्या बदल्यात आपण फक्त  फुला द्यायची बस...इतकच....मनाप्रमाणे वागायची  सवलत नाही...फुला नाही आली तर काही दिवसात झाड बदली तरी होणार, कोणाला देऊन तरी टाकणार किंवा मग कोणी काळजी घेणार नाही.....

या सगळ्यात त्या छोट्या झाडाला कधी कळतच नाही कि मोठा होणं म्हणजे फक्त फुला देणा नाही..तर मोठा होणं म्हणजे जमिनीत रुजणं....असेल तश्या जमिनीतून वर येणं... खोलवर आपली मूळ रोवून  घट्ट उभा राहणं .....आणि मग पूर्ण वाढ झाल्यावर फुलायला सुरवात होणं, बहरू लागणं.....जोपर्यंत स्वतःला स्वतःचा जीव जागवता येत नाही तोपर्यंत फुला येतच नाहीत...हा साधा निसर्ग नियम नाही काळात त्या छोट्याश्या झाडाला...कारण कधी ते  तसा जगलच नाही....
आपला पण होता असाच....आजकाल मोठ्या मोठ्या पोस्ट्स वर भराभर वर जाणारी आमची पिढी, ८-१० लाख अगदी एका वर्षात कमावणारे आम्ही.....या छोट्या झाडां सारखेच  आहोत....सगळ्या लिमिटेड आणि आखीव गोष्टी मिळाल्या...मग लागलो अकाली फुलायला....पण जेव्हा परिस्थीची झळ बसते तेंवा कळून येत कि आपली मुळ मजबूत नाही आहेत...पिशवीच्या पलीकडे खूप गोष्टी आहेत...प्रत्येक  वेळी कोणी ओर्गानिक देईल च असा नाहीये..आणि जास्त ओर्गानिक पण आपल्यासाठी चांगला नाही कारण....त्यामुळे आपल्या capacity च्या बाहेर आपल्याला काहीच करता येत नाही...ओर्गानिक फक्त असलेली गोष्ट वाढवू शकत...काही नवीन निर्माण नाही करू शकत...पण आम्हाला कळलच नाही कि आमची capacity काय आहे...कारण आम्ही ते समजायच्या आत च फुलायला पण लागलेलो....
personality grooming च्या नावाखाली होणाऱ्या ओर्गानिक च्या भडिमारात आम्हाला आमची मूळ मजबूत करता येतच नाहीत, आम्हाला नीट रुजातच येत नाही, पूर्ण वाढ होण्याआधीच आम्ही फुलायला लागतो, बहरायला (????) लागतो...... 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: