मैत्र! एक गोंडस नाव, एका नात्याचं. रम्य बालपणात; त्या वेड्या भिरभिरणाऱ्या वयात हे मैत्र किती तऱ्हांनी बागडत असतं आपल्याबरोबर, नाही? या मैत्रीला कुठे बांधून धरून ठेवावं कळतच नाही तेव्हा. समुद्रकाठच्या वाळूसारखी सटकून जाते ती पायाखालून. मग वाळू सोडून नावेत बसतो आपण; लाटांवर स्वार होण्यासाठी, एकटेच. पण कसा कुणास ठाऊक, आहे आहे म्हणेपर्यंत रस्ता चुकतो आपला. कायमची चुकामूक. मग आपापल्या वाटेवरून चालत राहायचं, एवढंच उरतं आपल्या हातात. पण त्या मैत्रीला सुरक्षित जपून ठेवायचं काम चोख बजावतं आपलं मन.....
Mi...
- Shraddha
- Mumbai, Maharashtra, India
- मी.... मी आहे हा असा आहे, पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या... अगदी एखाद्या कवीतेसारखा, आवडली तर ऐका नहितर नीघून जा... कुणालही सांगणार नाही,जबरद्स्ती तर मुळीच नाही, समजले पटले तर करा नाहीतर विसरून जा... तुम्ही जगताय ते योग्य अन् मझ जगण अयोग्य, जरा असही जगून बघा निश्फळ वाटल तर नावं ठेवा... तुमच्या आध्यात ना मध्यात ना मझा कुणाला त्रास, कशाला उगीच वैतागताय कशाला उगीच सन्ताप्ताय... करावस वाटलं तर एकच् करा मी जगतोय तस मला जगू द्या... का नवं ठेवता उगाच मी करतोय ते मला करु द्या... म्हणूनच म्हणतो.. मी आहे हा असा आहे, पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या
५ टिप्पण्या:
what about a few lines in English?
नमस्कार,
आपला ब्लॉग पाहिला. काही पोस्टस् चाळल्या. पाऊस हा आपल्या आवडीचा विषय दिसतो. मैत्री, आठवणी, भावना यांचे चित्रण भरपूर प्रमाणात चित्रण आपण केल्याचे दिसले. मराठी साहित्यात ललित लेखनामध्ये रवीद्र पिंगे व यशवंत पाठक यांची नावे अग्रस्थानी आहेत. त्या व्यतिरिक्त शांता शेळके यांनीही काही प्रमाणात ललित लेखन केलेले आहे. या त्रयीचे लेखन आपण वाचले नसल्यास जरूर वाचा.
फोटोंचा हलता पट हे तुमच्या ब्लॉगचे वैशिष्ट्य आहे.ते फोटो आवडले. निसर्गाचे शक्य तितके फोटो आपण काढलेले दिसले.
ब्लॉग शक्य तितका सजवलेला आहे. पाहायला छान वाटतो. सौदर्यासक्त दृष्टी ठायी ठायी जाणवते.
एकूण शुभेच्छा.
- केदार पाटणकर
@kedar thanks for the comprehensive feedback
अहो केदार भाउ श्रद्धा ताई च्या लिखाणाचा आस्वाद घ्या की... त्यांच्या लिखणापेक्षा तुमची कमेंट च भली मोठी आहे
@Divinetej...u mistakenly read kedar's coment as a post i feel....so u r comment came on the "comment" instead of post...please comment on post too
टिप्पणी पोस्ट करा